मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारणार- हेमंत नगराळे

हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारातच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारणार- हेमंत नगराळे
SHARES

हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारातच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईची मलिन झालेली प्रतिमा चांगली करण्याचं काम करणार आहे. यामध्ये सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आम्ही चांगंल पोलीस दल म्हणून काम करू, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो, असं यावेळी नगराळे यांनी म्हटलं आहे. 

परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.  मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून काही तासांतच सूत्रे स्वीकारत नगराळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील स्फोटक प्रकरणावर योग्य ती कारवाई करणार अशीही ग्वाही दिली. या प्रकरणाचा विविध संस्थांकडून तपास सुरु आहे. हा तपास योग्य दिशेने होईल असा मला विश्वास आहे. जो दोषी असेल त्याला निश्चित शिक्षा होईल, असंही ते म्हणाले.

नगराळे म्हणाले की, आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्या मुंबई पोलीस कठीण समस्येतून जात आहेत आणि ही समस्या आपण सर्वांच्या मदतीने व माझ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासानाने माझी नेमणूक केलेली आहे.पत्रकारांनी वैचारिक पातळीवर न बोलता, सत्य परिस्थितवर बोलावे. ज्या घटनेची चौकशी सुरु आहे. त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. मी नवीन कार्यभार स्वीकारला आहे. माझ्याकडे सध्या घडत असलेल्या घटनांचे कोणतीही माहिती नाही. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा