ड्रग्ज तस्करांविरोधात मुंबई पोलिसांची धारावीत मोठी कारवाई

शेखच्या चौकशीत शहर आणि उपनगरात ड्रग्ज तस्कर आणि ग्राहकांसाठी एका मोठ्या नेटवर्कचा खुलासा केला आहे.

ड्रग्ज तस्करांविरोधात मुंबई पोलिसांची धारावीत मोठी कारवाई
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकऱणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्करांची धरपकड सुरू केली आहे. अशाच एका कारवाईत धारावीतून घाटकोपरच्या एएनसीच्या पोलिसांनी पकडलेल्या आऱोपीकडे १.२० किलोचे हेरोइन आढळून आले आहे. मंजर डी. शेख असे या आरोपीचे नाव आहे. बाजारात या ड्रग्जची किंमत २.४० कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  

हेही वाचाः- बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

धारावीच्या ६० फूट रोडवर हा ड्रग्ज तस्कर १.२० किलोग्रॅम हेरोइनची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती घाटकोपरच्या एएनसीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार मंजर डी. शेख हा संशयित रित्या त्या ठिकाणी फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतत त्याची अंगझडती घेतली असता. पोलिसांना त्यांच्याजवळी १.२० किलो हेरोइन आढळून आले. शेखच्या चौकशीत शहर आणि उपनगरात ड्रग्ज तस्कर आणि ग्राहकांसाठी एका मोठ्या नेटवर्कचा खुलासा केला आहे.

हेही वाचाः-पोलीस मारहाण प्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्याला ३ महिन्यांची शिक्षा

पोलिसांनी असे म्हटले आहे की, २०१८ मध्ये एएनसी घाटकोपर युनिटने याच प्रकारचे ड्रग्ज प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आणला होता. मुंबई कस्टम आणि डीआरडीएने न्हावा शेवा पोर्ट ट्र्स्टवर कार्गो कंटेनर मधून जवळजवळ १ हजार कोटी रुपयांच्या किंमतीचे १९१ किलोग्रॅम हेरॉइन जप्त केले होते.

Read this story in English
संबंधित विषय