आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर टोळीचा पर्दाफाश

दोघांजवळील बँगेत 1 किलो 400 ग्रँमचा चरस आढळून आला. बाजारात या चरसची किंमत 5 लाख 60 हजार इतकी आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर टोळीचा पर्दाफाश
SHARES

मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या वांद्रे युनिटने लाखोंच्या चरस तस्करी प्रकरणी दोघांना मस्जिद बंदरहून अटक केली आहे. यासीन अब्दुल (32), बादशहा पल्लीकल समद (29) अशी या दोघांची नावे आहेत. भारतातील प्रमुख विमानतळाहून हे चरस कतार या देशांमध्ये पाठवणार होते.

मुंबईतल्या मस्जिद बंदर येथील कर्नाक बंदरच्या बस स्टाँपवर काही जण अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदिप लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार वांद्रे युनिटने 3 आँक्टोंबर रोजी सापळा रचून यासीन अब्दुल (32), बादशहा पल्लीकल समद (29) या दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांची अंग झडती घेतली असता. त्या दोघांजवळील बँगेत 1 किलो 400 ग्रँमचा चरस आढळून आला. बाजारात या चरसची किंमत 5 लाख 60 हजार इतकी आहे.


या दोघांच्या चौकशीत  हे दोघे ही केरळच्या  कासारगौडचे रहिवाशी असल्याचे पुढे आले आहे. नोव्हेंबरमध्ये विमानतळावर एका जोडप्याच्या बँगमध्ये 'एमफेटामाईन' ड्रग्ज मिळाले होते. त्या दोघांच्या चौकशीतूनच या दोन आरोपींचा माग पोलिसांनी काढाला आहे. ही आंतरराष्ट्रीय टोळी भारताच्या विविध विमानतळाहून कतार या राज्यात हे ड्रग्ज पाठवणार होती. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा