मुंबईत IPS आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

या बदल्या होणे अपेक्षित होते. त्यानुसार सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांनी परिमंडळानुसार या बदल्या करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मुंबईत IPS आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. १२ बड्या IPS आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा पूर्ण झालेला होता. त्यामुळे या बदल्या होणे अपेक्षित होते. त्यानुसार सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांनी  परिमंडळानुसार या बदल्या करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डाँक्टरांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस ही मोठ्या शर्तीने शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अनेक आयपीएस आणि एसपीएस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा संपन्न झाला होता. मात्र कोरोनामुळे त्यास विलंब लागला. दरम्यान मुंबईतील १२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले आहेत.

पहा कोणाची बदली कुठे

 या बदल्यांमध्ये परिमंडळ १ जे अतिशय महत्वाचे मानले जाते. त्या ठिकाणी परिमंडळ ९ चे IPS अधिकारी परमजीत सिंग दाहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ १ मधील विद्यमान अधिकारी संग्रामसिंग निशानदार यांच्यावर ( पोलिस आँपरेशन)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रोटेक्शन पदी असलेल्या प्रशांत कदम यांची परिमंडळ ७ येथे नियुक्ती करण्यात आली आहे. एसबी-१ ला असलेल्या गणेश शिंदे यांची बंदर परिमंडळ येथे बदली करण्यात आली आहे. तर त्या ठिकाणी असलेल्या विद्यमान अधिकारी डाँ. रश्मी करंदीकर यांनी सायबर कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखा १ च्या पोलिस उपायुक्त पदी असलेल्या शहाजी उमाप यांची एसबी-१ ला बदली करण्यात आली असून परिमंडळ ११ ला असलेले डाँ मोहन दहिकर यांची गुन्हे शाखा १ येथे नियुक्त करण्यात आली आहे. तर सायबर कक्ष येथे असलेल्या विशाल ठाकूर यांनी परिमंडळ ११ येथे बदली करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलिस आँपरेशन पदी असलेले प्रणय अशोक यांची बदली परिमंडळ ५ येथे करण्यात आली आहे. तर नंदकुमार ठाकूर यांची बदली एचक्यू १ येथे करण्यात आली आहे.  एचक्यू १ ला असलेल्या पोलिस उपायुक्त एन.अंबिका यांच्यावर परिमंडळ ३ ची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. तर परिमंडळ ५ च्या नियुक्ती ठाकरे यांची प्रतिनियुक्तीवर केंद्रीय गुप्तवार्ता येथे सह उपसंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  

हेही वाचाः- रुग्णांकडून अतिरिक्त  पैसे आकारल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल

हेही वाचाः- Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा