रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल

रुग्ण अत्यंत अडचणीत असतानाही रुग्णालयांचा लोभ कमी होत नसल्याचे या उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे.

रुग्णांकडून अतिरिक्त  पैसे आकारल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल
SHARES

कोरोना रुग्णांवर अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी प्रसिद्ध नानावटी रुग्णालयावर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पालिकेच्या  अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी १८८ चे उल्लघंन केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंदवल्याची माहीती पोलिस उपायुक्त  अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

हेही वाचाः- दिलासादायक! धारावी ७० टक्के कोरोनामुक्त

संपूर्ण देशात कोरोनाविरोधी लढाई सुरू असताना डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्माचाऱ्यांची सर्वच स्तरातून प्रशंसा होत आहे. या बरोबरच रुग्णालयांकडेही मोठ्या आदराने पाहिले जात आहे. मात्र, रुग्णालयांना असा आदर प्राप्त होत असताना काही नफखोर रुग्णालयांची काही चीड आणणारी उदाहरणेही पुढे येत आहेत. रुग्ण अत्यंत अडचणीत असतानाही रुग्णालयांचा लोभ कमी होत नसल्याचे या उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात ही असाच एक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांकडून रुग्णालय प्रशासन अतिरिक्त पैसे आकारत असल्याचा आरोप पालिकेने केला आहे.  रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या कक्षात सर्वच कोविड रुग्णांना सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.  असे असताना डाँक्टरांकडून मात्र प्रत्येक पेशन्टच्या बिलात पीपीई किटचे स्वतंत्र पैसे लावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचाः-Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार

याबाबत  काही रुग्णांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी रुग्णांच्या बिलात पैसे जादा आकारल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार रुग्णालयाचे ट्रस्टी, अध्यक्ष आणि डाँक्टरांविरोधात पोलिसांनी १८८ अंतर्गत गुन्हा नोंदवलेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा