Advertisement

दिलासादायक! धारावी ७० टक्के कोरोनामुक्त

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी ७० टक्के कोरोनामुक्त झाली आहे.

दिलासादायक! धारावी ७० टक्के कोरोनामुक्त
SHARES

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. पण दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जाणारं धारावी कोरोनामुक्त होत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी ७० टक्के कोरोनामुक्त झाली आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा आणि पालिकाचे सर्व प्रयत्न यशस्वी ठरलेत.

धारावीतील एकूण २२८२ रुग्णांपैकी १६१८ रुग्ण बरे झाले आहेत. धारावीत सुरुवातीला दिवसाला ८० ते ९०च्या आसपास कोरोना रुग्ण सापडायचे. आता गेल्या दीड महिन्यापासून धारावीत २०च्या आत रुग्ण सापडत आहेत. बुधवारी धारावीत १४ रुग्ण सापडले. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या २ हजार २८२ झाली आहे. धारावीत आतापर्यंत सुमारे ८२ रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला.

सुरुवातीला धारावीतील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता कोरोना रुग्णांची संख्या लाखांच्यावर जाईल, अशी भीती वर्तवण्यात येत होती. पण आता परिस्थिती पूर्ण उलटी आहे. सध्या धारावीत ५३५ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ हजार ६१८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका, स्वयंसेवी संस्था, राज्य सरकार आणि अन्य संस्थांनी घरांमध्ये जाऊन सर्व्हे केला होता. धारावीत सौम्य लक्षणे असलेल्यांनाही सुरुवातीच्या काळात क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. रहिवासी देखील डॉक्टर्स, पालिका अधिकाऱ्यांना साथ देत होत्या. अखेर धारावीतील करोनाची वाढणारी संख्या नियंत्रणात आली.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १९८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १५११ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.



हेही वाचा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार

Coronavirus In Thane: ठाण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १ हजार पार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा