Advertisement

चारकोपमधील सोसायटीचं कौतुकास्पद पाऊल, केली आयसोलेशन रुमची सोय

प्रशासनाला साथ म्हणून मुंबईतल्या एका सोसायटीनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सोसायटीचं ऑफिस त्यांनी आयसोलेशन रुममध्ये रुपांतर केलं आहे.

SHARES

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus Update) परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून (BMC)विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच प्रशासनाला साथ म्हणून मुंबईतल्या (Mumbai News) एका सोसायटीनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सोसायटीचं ऑफिस त्यांनी आयसोलेशन रुममध्ये रुपांतर केलं आहे.

अनेकदा कोरोना रुग्ण (Corona Patients in Mumbai) किंवा त्यांच्या कुटुंबियांना भितीपोटी वेगळी वागणूक दिली जाते. जरी रुग्ण बरा होऊन आला तरी त्याच्या कुटुंबियांना वाळीत टाकलं जातं. मध्यंतरी अशा काही घटना देखील अघडकीस आल्या होत्या. पण चारकोपमधील (Charkop) अमिषा अपार्टमेंटनं या परिस्थितीतून मार्ग काढत कौतुकास्पद काम केलं आहे.

अमिषा अपार्टेमेंटमधल्या एका रहिवाशाला कोरोना (Corona Positive) झाल्याचं सोमर आलं. सोसायटीतल्या समिती सदस्यांनी ठरवलं की, त्याला पालिकेच्या क्वारंटाईन केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करण्याऐवजी सोसायटीच्या ऑफिसमध्ये ठेवलं तर त्याला सर्व सोईसुविधा पुरवणं शक्य होईल. त्यानंतर सोसायटीचं ऑफिस आयसोलेशन सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आलं.

कोरोना पॉझिटिव्ह आलेला रुग्ण ५ स्टार हॉटेलमध्ये काम करतो. तो १ बीएचके फ्लॅटमध्ये आई-वडिल, पत्नी आणि ४ वर्षांच्या मुलासह सोसायटीमध्ये राहतो. कूपर रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोसायटीच्या व्यवस्थापकिय समितीला कळवण्यात आलं. त्यानंतर व्यवस्थापकिय समितीनं चर्चा करून सोसायटीतच आयसोलेशन रुम तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोसायटीच्या ऑफिसमधील सर्व फर्निचर काढून त्याचं आयसोलेशनमध्ये रुपांतर केलं. याशिवाय ऑफिसच्या बाजूलाच टॉयलेटची देखील व्यवस्था आहे.

पालिकेचे डॉक्टर्स रोज तपासणीसाठी येतात. रुग्णाची प्रकती सुधारत आहे. तो लवकरच त्याच्या कुटुंबियांना भेटेल. याशिवाय त्याला रोज घरचं जेवण मिळतं. त्याच्यासाठी पीपीई किट घातलेला एक केअर टेकर देखील ठेवला आहे. त्याच्या कुटुंबियांनी दिलेलं जेवणं रुमबाहेरील एका टेबलावर ठेवतो. जेवणासाठी डिस्पोजेबल प्लेट्स आणि ग्लास पावरण्यात येत आहेत. त्याची वेगळी व्हिलेवाट देखील लावलीजाते.

मनु पटेल, सचिव, अमिषा अपार्टमेंट

सोसायटीच्या सदस्यांकडून रुग्णाची देखभाल तर केली जातेच. शिवाय त्याच्या कुटुंबियांची देखील काळजी घेतली जात आहे. कुटुंबियांना घरातच क्वारंटाईन होण्यास सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक गोष्टी सोसायटीतील रहिवासी त्यांना पुरवत आहेत. दुध किंवा त्यांच्या गरजेचं इतर साहित्य याची सोय करून दिली जात आहे.


जर येत्या काळात आणखी रुग्ण आढळले तर त्यांच्यासाठी देखील सोसायटीच्या ऑफिसमध्ये व्यवस्था केली जाईल. गरज पडल्यास सोसायटीतील रिकामे फ्लॅट्स देखील क्वारंटाईन रुम म्हणून वापरले जातील. केवळ प्रकृती गंभीर असेल अशाच रुग्णांना हॉस्पीटलमध्ये दाखल केलं जाईल, असं देखील मनु पटेल यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या किमतीत वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा