Advertisement

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या किमतीत वाढ

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीनं हेपॅरिनची किंमत ५०% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या किमतीत वाढ
SHARES

केंद्रानं हेपॅरिन इंजेक्शनच्या किमतीत ५०% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीयूमध्ये दाखल कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन दिलं जातं. फुप्फुसातील रक्ताच्या गुठळ्या दूर करण्यासाठी त्याचा वापर होतो. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीनं हेपॅरिनची किंमत ५०% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

एनपीपीएच्या अध्यक्ष शुभ्रा सिंह यांनी दिव्य भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, कोविड रुग्णांसाठी हे इंजेक्शन महत्त्वाचे आहे. परंतु २०१८ पासून त्याच्या कच्च्या मालाच्या किमतीत २०० टक्क्यांनी वाढ झाली. तरी त्याची किंमत वाढली नव्हती.

सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर एम. बाली म्हणाले की, आयसीयूमध्ये दाखल रुग्णांना हेपरिन इंजेक्शन दिले जाते. आता केवळ पल्मोनरी एम्बोलिझम असलेल्या रुग्णांना दिले जाते.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे २४५ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ९०३ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. मंगळवारी १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.



हेही वाचा

मृत्यू दर घटवण्यासाठी बीएमसीची 'सेव्ह लाइव्ह्स स्ट्रॅटेजी' मोहिम

मिरा-भाईंदरमध्ये कोरोना मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्ण अधिक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा