दक्षिण मुंबईतील पोलिस उपायुक्ताला कोरोनाची लागन


दक्षिण मुंबईतील पोलिस उपायुक्ताला कोरोनाची लागन
SHARES
 मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना, कोरोना या महामारीशी संपूर्ण प्रशासन दोन हात करताना दिसत आहे. माञ या सर्वात महत्वाची भूमिका बदावत आहेत ते पोलिस, त्यामुळेच या महामारीने आता पोलिसांना ही लक्ष केले आहे. दक्षिण मुंबईतील एका पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


दक्षिण मुंबईच्या ज्या विभागाची जबाबदारी या अधिकाऱ्यावर आहे. त्या ठिकाण अनेक कन्टेन्मेट झोन आहेत. या कन्टेन्मेट झोनमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र ते तैनात होते. या अधिका-याचा जवळचा पोलिस कर्मचारी कोरोना संशयीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी स्वतःला स्वतःहून विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला. कारण ज्या पोलिस कर्मचाऱ्याला रिपोट पाँझीटिव्ह आला तो या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या वारंवार संपर्कात होता. वैद्यकिय तपासात त्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा रिपोर्ट ही प़ॉझीटीव्ह आल्याचे समजले. एका वरिष्ठ अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

राज्यात आता एकूण 422 पोलिस कोरोनााधीत आहेत. एकट्या मुंबईत 211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 51 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 49 कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले  आहेत. मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. सध्या मुंबईत 150कोरोनाग्रस्त पोलिस उपचार घेत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा