मुंबईतल्या दाट वस्तींवर राहणार ड्रोनची नजर


मुंबईतल्या दाट वस्तींवर राहणार ड्रोनची नजर
SHARES
वांद्रेत लाँकडाऊनच्या विरोधात दाटवस्तीत राहणाऱ्या लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर अशा वस्त्यांवर ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. परिसरात जमावबंदी आहे, कायदा हातात घेऊ नका... सहकार्य करा अशा प्रकारेचे आवाहन ही पोलिस आता ड्रोनद्वारे अशा वस्त्यांमध्ये करणार असल्याचे गृहमंञी अनिल देशमुख यांनी सांगितले. त्याचे प्रात्यक्षिक ही देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोळीवाडा, धारावी, भेंडीबाजार, वांद्रे, शिवाजीनगर,जोगेश्वरी या सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी या भागांवर नजर ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी वांद्रे येथील अनेक बेरोजगार नागरिक त्यात्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष गाड्यासोडा अशा मागण्याकरत रस्त्यावर उतरले. पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. माञ काही केल्या जमाव ऐकत नसल्याने पोलिसांना त्या ठिकाणी सौम्यलाठीचार्ज करावा लागला.



हा जमाव कामगारांच्या उद्रेकातून होता, की या मागे काही राजकारण होते याची चौकशी करण्याचे आवाहन गृहमंञ्यांनी दिले आहेत. त्याच बरोबर अशा प्रकारे अनेय कुठे ही प्रकार घडू नयेत. त्या अनुशंगाणे पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने दाटीवाटीची वस्ती असलेल्या ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी ड्रोनचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. अनेकदा असे परिसर बाहेरून म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. माञ गल्लीबोळात नागरिक एकञ जमत असल्याचे आढळल्याने अशातूनच कोरोना संसर्ग रोगाचा फैलाव होण्यास मदत मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंञ्यांनी सांगितले.

 
यापूर्वी मुंबई पोलिसांनी मराठा मूक मोर्चा आंदोलन, कीर्ती व्यास हत्या प्रकरण, गणेशोत्सवात ड्रोनद्वारे गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवली होती. मात्र, राजकीय घडामोडींसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी पोलिसांना सिंगापूरच्या कंपनीकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यापूर्वी मराठा आंदोलन, कीर्ती व्यास हत्या प्रकरण, गणपतीत मुंबई पोलिसांनी ड्रोनचा वापर केला होता. शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट दिली त्यावेळी प्रथम या ऑडिओ ही यंत्रणाही गणेशोत्सवाच्या काळातच मुंबई पोलिस दलाने सामील केली होती.
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा