मुंबई पोलिस गस्त घालणार ‘स्पोर्ट्स बाईक’वरून

पोलिस दलात आता नव्या २५० ‘स्पोर्ट्स बाईक’ दिल्या जाणार आहेत.

मुंबई पोलिस गस्त घालणार ‘स्पोर्ट्स बाईक’वरून
SHARES

कोरोना संकटाच्या काळात पोलीस दल सर्वात पुढे येऊन कार्य करत आहे. या दलाला अधिकाधिक बनविण्याच्या दृष्टीने वारंवार प्रयत्न केले जात असतात. याचेच एक उदाहरण मुंबई पोलीस दलात पाहण्यास मिळाले. काही दिवसांपूर्वीच समुद्र चौपाटीवर गस्त घालण्यासाठी पोलिसांनी ‘सेगवे’चा पोलिस दलात समाविष्ठ करून घेतला. सध्या गस्तीसाठी असलेल्या अनेक दुचाकी या निकृष्ठ झालेल्या आहेत. त्यामुळे पोलिस दलात आता नव्या २५०  ‘स्पोर्ट्स बाईक’ दिल्या जाणार आहेत.

हेही वाचाः-Exclusive मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यात होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’

गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्याच्या वापरातून पोलीस दलाने आपली कार्यक्षमता व पारदर्शकता देखील वाढवली आहे. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा (एमपीआयएस), ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, एम पासपोर्ट, संवाद ॲप्स, ट्विटर हँडल, मोबाईल सर्व्हेलन्स वाहने यामुळे पोलिसांच्या कामाला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या दलात अश्व दलाचा समावेश करून घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत पोलिसांकडे अश्वदल कार्यरत होतं. १९३२ मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता ८८ वर्षांनी हे युनिट सुरु होतं आहे. इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीचे अश्वदल होतं. या दलामध्ये ३० घोडे आहेत. त्यानंतर लगेचच समुद्र किनारी गस्तीसाठी ५० सॅगवेचा पोलिस दलात समावेश करून घेतला. यातील दहा सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

हेही वाचाः- अरे बापरे: राज्यभरात ८ हजारहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधित

दरम्यान पोलिस दलात गस्तीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दुचाकी या आता निकृष्ठ दर्जाच्या झाल्या आहेत. बीट मार्शलने बुलेटचा वापर करून पोलिस ठाण्याच्या हद्दीत परिणामकारक गस्त घालावी म्हणून पोलिस आयुक्तालयाकडून मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यास प्रत्येकी दोन हायस्पीड बुलेट देण्यात आल्या. मात्र त्यांची आयुमर्यादा ही संपली आहे. म्हणूनच पोलिस दलात आता नव्या कोऱ्या २५० स्पोर्टस बाईक सामील करून घेतल्या जाणार आहेत. या दुचाकीचे वैशिष्ठ म्हणजे त्या उंचीला कमी, पळण्यात तेज आणि पोलिसांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा त्यात असणार आहेत. (उदा डिक्स ब्रेक, सेल्फ स्टार्ट, माईक सिस्टम, ब्लिकंर लाईट, सामान ठेवण्यासाठी डिक्की) त्यामुळे  नव्या दुचाकी लवकरच मुंबईच्या सर्व पोलिसा ठाण्यात वाटल्या जाणार आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा