ड्रंक अँड ड्राइव्ह पडलं महागात!


ड्रंक अँड ड्राइव्ह पडलं महागात!
SHARES

मुंबई - नवे वर्ष साजरे करण्यासाठी शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात मुंबईकर घराच्या बाहेर पडले. यंदा चौपाटीसारख्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळत होती. त्यातच पब, बार यांसारख्या ठिकाणी देखील गर्दीचे प्रमाण दिसून आले. त्यातच मद्य प्राशन करून अनेकांनी वाहतुकीचे नियमही तोडले. अशा तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केलेली दिसत आहे.
31 डिसेंबरच्या रात्री ते 1 जानेवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई.

ड्रंक अँड ड्राईव्ह - 565
विदाउट हेल्मेट - 207
रॅश ड्राईव्हिंग - 13
इतर - 3 हजार 356
एकूण - 4 हजार 141 रुपये
दंड - 3 लाख 87 हजार 800 रुपये

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा