'ऑल आऊट ऑपरेशन' अंतर्गत ३३ जणांना अटक


'ऑल आऊट ऑपरेशन' अंतर्गत ३३ जणांना अटक
SHARES

मुंबईत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी कोणताही घातपात होऊ नये या दृष्टीकोनातून पोलिसांनी मुंबईत ‘आँल आऊट आँपरेशन’ राबवले. यात पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या ३३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त परमबीर सिंग, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आलं.

ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान, मुंबईत २२३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. यात रेकॉर्डवरील १३६९ गुंडांची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेल्या ५२ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. याशिवाय ६६ जणांना एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी शहरात १०१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी ८५७९ गाड्यांची तपासी करण्यात आली. तसेच १२ चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली. याशिवाय एमव्ही कायद्यानुसार, २४७९ ड्रायव्हरवर कारवाईही करण्यात आली.

ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत पोलिसांनी ७३९ हॉटेल्स आणि लॉजवर धाडी टाकल्या. यावेळी पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या ४० जणांवर कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये १३० फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा