रेल्वे सुरक्षा दलाचा तिकीट दलालांना दणका


SHARE

रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट दलालांना चांगलाच दणका दिला आहे. तिकीट दलालांकडून तब्बल 17 हजार 685 रुपये किमतीची तिकीटे रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केली अाहे. रेल्वे तिकीट दलालांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अनेकवेळा कारवाई केली आहे. सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण या स्थानकातून मोठ्या प्रमाणात दलाली दिसून येत होते. मात्र डोंबिवली येथील आशा पेराडाईज, दुकान नं. 8 मधून अमित कुमार मिश्रा (37) यांचाकडून तब्बल 17 हजार 685 रुपयांच्या किमतीची 8 रेल्वे ई-तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. त्याला तुरुंगात टाकले असून, रेल्वे कायदा 143 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या