डंपरच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू


डंपरच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू
SHARES

मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात डंपरच्या धडकेत एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग सकपाळ असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून मुन्नाकुमार चौहान (३१) असे या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचाः- आयटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवली, 'ही' आहे अंतिम तारीख

पोलीस नाईक पांडुरंग सकपाळ आणि त्यांचा वॉर्डन सहकारी भावेश पितळे हे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पश्चिम महामार्गावर हब मॉलच्या समोर आपल्या अ‍ॅक्टिव्हा स्कुटरने कर्तव्य बजावण्यासाठी जात होते. त्यावेळी डंपर चालक मुन्नाकुमार चव्हाण हा भरधाव वेगाने डंपर घेऊन त्यांच्या मागून येत होता. त्याने आपल्या डंपरने सकपाळ यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. यात दोघेही खाली पडले आणि सकपाळ यांच्या अंगावरून डंपर गेले.

हेही वाचाः- १ जानेवारीपासून बँकिंग, विमासंबंधी होणार 'हे' १० मोठे बदल

या अपघाताची माहिती जोगेश्वरी पोलिसांना मिळाल्यावर जखमी असवस्थेत दोघांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी पांडुरंग सकपाळ यांना मृत घोषित केले, तर वार्डन पिटले यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. ही घटना घडल्यावर डंपर चालक मुन्नाकुमार चौहान हा डंपर सोडून या दोघांना मदत न करता पळून गेला होता. ही घटना वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि डंपर ताब्यात घेऊन चालकांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्री मुन्नाकुमार याला अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा