मुलुंडमध्ये शाळेतच चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिपाई अटकेत

शिपायानं चिमुकलीला शाळेतील एका खोलीत नेत आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

मुलुंडमध्ये शाळेतच चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिपाई अटकेत
(Representational Image)
SHARES

मुलुंड (Mulund) पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेत शाळेच्या शिपायानंच साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assault) केल्याची धक्कादायक घटना घडली.

मुलुंड पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेच्या शिपायानं पटांगणात खेळण्यास आलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हेमंत दामोदर वैती असं या 51 वर्षीय नराधमाचं नाव आहे.

चिमुकली शाळेच्या पटांगणात खेळण्यासाठी आली होती. ही चिमुकली शाळेच्या पटांगणाच्या बाजूलाच राहते. त्यावेळी ती एकटीच मैदानात खेळत होती. शिपायाची नजर मुलीवर पडली आणि आजूबाजूला कोणीच नाही याची खात्री करत त्यानं तिला हाक मारून स्वतःजवळ बोलावलं.

शिपायानं चिमुकलीला शाळेतील एका खोलीत नेत आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडित चिमुकलीनं सर्व घटना घरी जाऊन आपल्या आईला सांगितली. तिच्या आईनं तात्काळ नवघर पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ याप्रकाराची दखल घेतली.

नवघर पोलिसांनी याबाबत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ठाण्यातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. सदर आरोपी हा शाळेत गेली तीस वर्ष शिपाई म्हणून काम करत आहे.हेही वाचा

खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा मोठा साठा भिवंडीतून जप्त

धक्कादायक! प्रियकरानं व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यानं प्रेयसीची आत्महत्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा