अल्पवयीन मुलीला ढकलंलं वेश्या व्यवसायात, कास्टिंग डायरेक्टर अटकेत


अल्पवयीन मुलीला ढकलंलं वेश्या व्यवसायात, कास्टिंग डायरेक्टर अटकेत
SHARES

मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना फसवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेट मॅनेजरला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. आशिष पटेल (३५), मोहम्मद इस्माइल इम्रान शेख (२९), विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया (२२) अशी या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकललं होतं. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः- मुंबईच्या तापमानात घट; किमान तापमान १५.३ अंश

टेलिव्हिजन सिरियलमध्ये काम करणारी १४ वर्षीय तरुणी ही पालघर परिसरा राहते. मॉडेलिंग क्षेत्रात काम करणारी तरुणी एक वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबई प्रयत्न करत होती. अनेक छोट्या मोठ्या सिरियलमध्ये या तरुणीने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याच कामादरम्यान तिची ओळख ही आरोपी कास्टिंग डायरेक्टर विनोदकुमार अजनेरीया याच्याशी झाली होती. त्यानंतर विनोदकुमारने तिची ओळख दुसरा कास्टिंग डायरेक्टर आशिष पटेल याच्याशी करून दिली. त्यावेळी त्याने मुलीला तिच्या घरातून सिरियलमध्ये चांगले काम देण्याचे आमीष दाखवून मुंबईला बोलावले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मुलीला परपुरूषाशी संबध ठेवण्यावर जबरदस्ती केली. ऐवढेच काय तर तिला त्यातून चांगले पैसे मिळतील असे तिची विक्री केली.

हेही वाचाः- सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

 या घटनेची माहिती  मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांच्या मदतीने मॅकडोनल्ड हाँटेलयेथे तपासणी केली. त्याठिकाणाहून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार अंधेरी पोलिस ठाण्यात ३६६(क), ३७०(१)(४),३७२,३४, भा.द.विसह ४,५, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ सह कलम ४,१६,१७,१८ पोस्को अँक्ट २०१२ अंतर्गत तिनही आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा