भारतीय स्टेट बँक उडवून टाकू, पाकिस्तानातून धमकीचा फोन

धमकीच्या फोनमुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे.

भारतीय स्टेट बँक उडवून टाकू, पाकिस्तानातून धमकीचा फोन
SHARES

भारतीय स्टेट बँकेच्या मुख्यालयाला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या फोनमुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली असून मुंबई पोलीस सतर्क झाले असून तपासाला सुरूवात केली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?  
मुंबईतील भारतीय स्टेट बँकेच मुख्यालय उडवून देण्याचा धमकीचा फोन आला आहे. यासंदर्भात  मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच बँकेचे चेअरमन यांचं अपहरण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसात हा धमकीचा दुसरा फोन आहे. धमकी देणार पाकिस्तानचा असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. कॉलरने आपण पाकिस्तानातून फोन केला असल्याचा दावा केला आहे. पोलीस पुढील तपास सुरू आहे.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा