बेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा

बेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते. आता ट्राफिक पोलिस बेकायदेशीर नंबर प्लेट लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबवत आहेत.

बेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा
SHARES

बेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते. आता ट्राफिक पोलिस बेकायदेशीर नंबर प्लेट लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांना पकडण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर केली आहे.

यापूर्वी वाहतूक अधिकारी बेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर स्पॉट झाल्यावरच कारवाई करत होते. अधिकाऱ्यांनी आता जाहीर केलं आहे की, ते आता सीसीटीव्ही फुटेजवर नजर ठेवतील. बेकायदेशीर नंबर आढळल्यास कायदेशीर कारवाई करतील.

मोटार वाहन कायद्यांतर्गत उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्टाईलिंग करण्यासाठी नंबर प्लेटवर वैयक्तिक मॉनिकर्स वापरतात त्यांची तपासणी देखील केली जाईल.

यावर्षी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान वाहनांचे उल्लंघन करणार्‍या १ हजार ९४७ जणांवर कारवाई केल्याचे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. तथापि, २०१९ मध्ये एकूण ३ हजार २१६ नंबर प्लेटचं उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा

ब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड

'या' वेळेत लोकल प्रवसाची वकिलांची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा