Advertisement

ब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं महालक्ष्मी स्थानकात रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) बसण्यासाठी किमान १९९ झाडं तोडण्याची घोषणा केली आहे

ब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं महालक्ष्मी स्थानकात रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) बसण्यासाठी किमान १९९ झाडं तोडण्याची घोषणा केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी पालिकेनं लॉकडाऊनपूर्वी निविदा काढल्या होत्या.

तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात ४५० झाडं महालक्ष्मी रेसकोर्सच्या आसपास १५ दिवसात लावण्यात येतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथं झाडे लावण्याबरोबरच, हँकॉक पुलाच्या उर्वरित भागाच्या बांधकामासाठी ३२ झाडेही तोडली जातील. या दोन प्रस्तावांवर अधिकाऱ्यांशी आठवड्याभरात चर्चा होतील.

महालक्ष्मी इथं दोन नवीन पूल डॉ. ई मोसेस रोड आणि केशवराव खाडये मार्गावर आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की ७८५ कोटी खर्च करून हे पूल बांधले जातील.

दरम्यान, हँकॉक पुलाचा उर्वरित भाग मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु त्यानंतर मुख्यत्वे कोविड लॉकडाऊनमुळे हे काम लांबणीवर पडले. या वर्षाच्या सुरूवातीस अनेक पूल आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांना उशीर झाला आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी नागरी प्रकल्पांकरिता नवीन योजना तयार केल्या आहेत आणि त्यासाठी पूर्ण झालेल्या सुधारित मुदतीही दिल्या आहेत.हेही वाचा

पुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; दुरूस्तीच्या खर्चातही वाढ

मिठी नदीचा पूर टाळण्यासाठी पालिका माहीम कॉजवे इथं फ्लडगेट्स बांधणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा