Advertisement

पुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; दुरूस्तीच्या खर्चातही वाढ

पायाभूत सेवासुविधांचा विकास वेगानं करण्यासाठी महापालिका १०६ पुलांची लहान दुरुस्ती, तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती करणार आहे.

पुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; दुरूस्तीच्या खर्चातही वाढ
SHARES

मुंबईतीस सीएसएमटी येथील हिमालया पुलाच्या दुर्घटनेनंतर जाग झालेल्या मुंबई महापालिकेनं मुंबईतील सर्व पुलांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेनं ३१४ पैकी २९६ पुलांचे ऑडिट केलं असून, यात २९ पूल अतिधोकादायक आढळलं. पायाभूत सेवासुविधांचा विकास वेगानं करण्यासाठी महापालिका १०६ पुलांची लहान दुरुस्ती, तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती करणार आहे. यापैकी बहुतांश कामं सुरू झाली असून, पावसाळ्यापूर्वी पुलांची कामं पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबईतील पुलांची कामं पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार आहे. सीएसएमटी येथील हिमालय पूल पडल्यानंतर ३१४ पुलांपैकी २९६ पुलांचं नव्यानं ऑडिट करण्यात आलं. यात २९ पूल अतिधोकादायक आढळले. तर १०६ पुलांची लहान दुरुस्ती तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती होणार आहे. ८७ पैकी ४८ पुलांचं काम हाती घेण्यात आलं आहे.

यामधील १४ कामं पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. सध्यस्थितीत हँकॉक, कर्नाक, महालक्ष्मी रेल्वे स्थानक, माहीम कॉजवे, नीलकंठ, मानखुर्द, विद्याविहार, बर्वेनगर, रेनेसान्स, हरितनाला, वीर संभाजीनगर मुलुंड, घाटकोपर येथील लक्ष्मीबाग, जोगेश्वरी रतननगर, कोरो केंद्र, मृणालताई गोरे पूल, गोखले पूल, धोबीघाट, पिरामल नाला आणि मेघवाडी इथं पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहेत.

हिमालय पूल कोसळल्यानंतर महापालिकेनं पुलांचा आढावा घेतला. आता दुरुस्तीसाठीच्या ८ पुलांमध्ये महालक्ष्मी रेल्वे पूल, सायन रेल्वे स्थानक पूल, टिळक पुलाकडील फ्लाय ओव्हर, दादर फुलबाजाराकडील पुलाचा समावेश आहे. माहीम फाटक पूल, करी रोड रेल्वे स्थानक पूल, सायन रुग्णालय येथील पूल आणि दादर धारावी नाल्यावरील पादचारी पुलाचाही समावेश आहे.

या दुरुस्तीसाठी अधिकच्या ८ कोटी ४६ लाख रुपयांस मंजुरी मिळाली. हिमालय पुलाची दुर्घटना झाली तेव्हा या ८ पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ३३ लाख खर्च होणार होता. मात्र आता हा खर्च २३ कोटी ६० लाख झाला. म्हणजे यात ८ कोटी ८४ लाखांहून अधिक वाढ झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा