सुनेला पकडले रेड हँड, प्रियकराच्या मदतीने केली सासूचीच हत्या

गरबा खेळण्याचे कारण देत राधा घराबाहेर गेली. त्यावेळेस दीपक माने घरी आला आणि त्याने झोपेतच सालुबाई यांची हत्या केली.

सुनेला पकडले रेड हँड, प्रियकराच्या मदतीने केली सासूचीच हत्या
SHARES

मुंबईच्या बोरिवली परिसरात प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलेल्या सूनेने सासूचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोनच दिवसांपूर्वी बोरीवली येथे ५७ वर्षीय महिलेचा घरात मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात या महिलेच्या हत्येमागील कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- NCB ची धडक कारवाई, ड्रग्ज तस्करीतला मोठा मासा गळाला

राधा आणि दीपक माने यांचे अफेअर असून त्यानेच हत्या केल्याची कबुली पोलिस चौकशीदरम्यान दिली आहे. राधाचा नवरा शहराबाहेर गेला असताना शनिवारी सालुबाई लाखे यांनी राधा आणि तिचा प्रियकराला घरोसमोरील बाथरूममध्ये गैरकृत्य कराताना दिसले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी सासूने सुनेला दिली. त्यानंतर राधाने सासूच्या हत्येचा कट रचला आणि घरी दगड आणून ठेवला. शनिवारी संध्याकाळी गरबा खेळण्याचे कारण देत राधा घराबाहेर गेली. त्यावेळेस दीपक माने घरी आला आणि त्याने झोपेतच सालुबाई यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी राधा आणि दीपक माने यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्यचे बोरिवली पोलिसांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा