व्हॉट्सअॅप प्रोफाइलमध्ये औरंगजेबचा फोटो वापरणारा पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण केल्यानंतर काही दिवसांनी तेथे काही लोक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचताना दिसले.

व्हॉट्सअॅप प्रोफाइलमध्ये औरंगजेबचा फोटो वापरणारा पोलिसांच्या ताब्यात
SHARES

मुघल सम्राट औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप प्रोफाइल म्हणून वापरल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी विश्व हिंदू परिषद, शिवशंभू प्रतिष्ठान, हिंदू सकल समाज संघटना आणि भाजपने शनिवारी रात्री याविरोधात तक्रार दाखल केली होती. 

याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९८ (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम १५३-अ (वेगवेगळ्या गटांमधील वैमनस्य वाढवणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची चौकशी सुरू आहे. मुघल सम्राट औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या कथित गौरवावरून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अलीकडच्या काळात जातीय तणावाच्या घटना समोर आल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण केल्यानंतर काही दिवसांनी तेथे काही लोक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचताना दिसले. या घटनेवर महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून काही तास इंटरनेट सेवाही बंद ठेवावी लागली. यासोबतच या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.



हेही वाचा

मीरा रोड हत्याकांड : पीडिता आणि आरोपी मनोज साने नवरा-बायको होते

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये जातीय तणावात वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा