पोलिसांच्या नावाने वायरल होणाऱ्या ‘या’ नियमावलीवर विश्वास ठेवू नका

पोलिसांनी खुलासा करत ते मेसेज हे फेक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या नावे व्हाँट्स अँपवर फिरत असलेल्या त्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

पोलिसांच्या नावाने वायरल होणाऱ्या ‘या’ नियमावलीवर विश्वास ठेवू नका
SHARES

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘मिशन बिगन अगेन’ च्या दुसऱ्या टप्याला सुरूवात करण्यापूर्वी पोलिसांकडून काही आदेश जारी केलेले आहे. मात्र काही समाजकंटक पोलिसांच्या नावाने व्हाँट्स अँपवर चुकीचे मेसेज वायरल करत आहे. याबाबत पोलिसांनी खुलासा करत ते मेसेज हे फेक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या नावे व्हाँट्स अँपवर फिरत असलेल्या त्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.  मात्र दुसरीकडे राज्याचा आर्थिक गाडा ही चालण गरचे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्या टप्याने राज्यातील लाँकडाऊन शिथिल करण्यास सुरूवात केली.  मात्र ३१ जुलैपर्यंत लाँकडाऊन ठेवत, अत्यावश्यक सेवा वगळता इतर वेळी बाहेर न पडण्याचे आवाहन केले. हे आवाहन करताना राज्यशासनाने आदेश काढून नियमावली जाहिर केली.  याबाबत पोलिसांनी ही सोशल मिडिया आणि पत्रकारांना माहिती देत नियम व अटी दिले होते. मात्र सोशल मिडियावर पोलिसांच्या नावाने चुकीचे नियम व अटींचा मेसेज मोठ्याप्रमाणात वायरल करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी  पुढे येत हा मेसेज खोटा असल्याचे जाहिर केले. तसेच अशा अफवांवर बळी न पडण्याचे आवाहन ही नागरिकांना केले आहे.तशी माहिती पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मुंबई पोलिसांच्या नावाची  खोटी नियमावली!

१ मेडिकल वगळता अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरु राहतील.

२. अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीला जाण्याची परवानगी. एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास त्याला अटक केली जाईल.

३. खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्यास तुमच्यासोबत पत्त्याचा पुरावा असलेलं कागदपत्र ठेवा, जसं की आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स

४. जर दुकान दोन किमी परिसरात असेल तर चालत जा

५. कोणीही वस्तूंच्या खरेदीसाठी कोणी वाहनाचा वापर करताना आढळलं तर वाहन जप्त केलं जाईल. (जवळच्या दुकानातूनच खरेदी करावं, असं सरकारचं मत आहे)

६. कारणाशिवाय घराबाहेर पडू नये

७. जर तुम्ही घराजवळच्या दुकानातूनच वस्तू ऑर्डर करत असाल आणि त्याची होम डिलिव्हरी होत असेल तर डिलिव्हरी बॉयला खरे कागदपत्रे आणि हेल्मेट बाळगायला सांगा

८. वस्तू खरेदी करताना एकमेकांपासून किमान पाच फुटांचं अंतर ठेवा. या नियमाचं उल्लंघन करताना कोणी आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

९. गृहनिर्माण सोसायटी आणि जवळच्या परिसरात फिरण्यासही परवानगी नाही.

१०. बाहेर फिरताना तुमचं वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं तर उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं जाईल.

११.जर कोणी ज्येष्ठ नागरिक घरात एकटेच राहत असतील तर मुंबई पोलिसांना 18002002122 या क्रमांकावर फोन करा.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा