वांद्रेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ


वांद्रेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
SHARES

मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एस.व्ही.रोडजवळ रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः- सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

वांद्रे परिसरात ९ च्या सुमारास माहिम काँजवेहून वेस्टन एक्सप्रेस हायवेला जाणाऱ्या एस.व्ही.रोडवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या व्यक्तीची प्रकती चिंताजनक असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने जवळील भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र अधिक उपचारासाठी त्या व्यक्तीला पुढे परळच्या केईएम रुग्णालयात आणले. मात्र उपचारा दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

हेही वाचाः- विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाकडून नोटीस

शवविच्छेदना दरम्यान या व्यक्तीच्या डोक्यात कुणीतरी तिक्ष्ण हत्याराने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी मारेकऱ्या विरोधात ३०२ भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. आरोपीला पकडण्यासाठी  हा व्यक्ती ज्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.  त्या परिसरातले सीसीटिव्ही पोलिस तपासत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा