धारावीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन तरुणाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल केले असून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडे चौकशी करून हत्येमागचे मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

धारावीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन तरुणाची हत्या
SHARES

धारावीत बुधवारी एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.  हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूंनी हल्ला केला. दिवसा उजेडात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केले असून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडे चौकशी करून हत्येमागचे मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचाः- Maratha reservation: मराठा आरक्षणावर आता दररोज सुनावणी

धारावीच्या सुभाष नगर परिसरात १७ वर्षीय कौशिक सुनील नारायण त्याच्या कुटुंबासमवेत राहत होतो. त्याचा फळ व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास तो घराजवळ फळे आणि भाजीपाला व्यवसाय करीत होता. या दरम्यान पाच आरोपींनी अचानक येऊन त्याच्यावर चाकूने हल्ला  केला. हत्येत वापरण्यात आलेला चाकू हा कौशिकच्याच ठेल्यावरचा असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने चाकून कौशिकवर असंख्य वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तावसिकला मारून आरोपींनी तेथून पळ काढला. स्थानिकांनी कौशिकला नागरिकांनी सायन रुग्णालयात नेले. मात्र डाँक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

हेही वाचाः- वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त प्रणव अशोक आणि धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश नागरे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्हीची मदत घेतली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा