वरळीत सुरक्षा रक्षकाची हत्या


वरळीत सुरक्षा रक्षकाची हत्या
SHARES

मुंबईच्या वरळी परिसरातील प्रसिद्ध दूरदर्शन इमारतीच्या शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वाँचमनची अनोळखी मारेकऱ्यांनी हत्या केली आहे. दसम दयाशंकर जैस्वार (५०) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक  तपास करत आहेत.

वरळीच्या दूरदर्शन केंद्रा शेजारी रिएँल्टी कन्स्ट्रक्शनद्वारे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच इमारतीचे सुरक्षा रक्षक म्हणून दसम हे मागील अनेक दिवसांपासून काम करत होते. शनिवारी मध्यरात्री दसम हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना. तिन अनोळखी व्यक्तींशी त्याचा क्षुल्लक कारणांवरून वाद झाला.  त्यावेळी तिघा तरुणांनी दसम यांना जबर मारहाण केली. एकाने तर लोखंडी राँडचं दसम यांच्या डोक्यात मारल्याने दसम हे जागेवर कोसळले. मारमारी दरम्यान झालेल्या आरडा ओरडीने इतर सुरक्षा रक्षकांनी इमारतीच्या मुख्य दरवाजाजवळ धाव घेतली. त्यावेळी दसम हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले इतर सुरक्षा रक्षकांना आढळून आले.

क्षणाचाही विलंब न लावता इतर सुरक्षा रक्षकांनी दसम यांना उपचारा करता परळच्या के.ई.एम रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान दसम याचा मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी इनव्हेस्टीकेशन व्हॅन,श्वान पथकांची मदत पोलिस घेत आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा