अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

अनिल आणि महेंद्र हे दोघे ही एकाच परिसरात रहात असून दोघांवर सराईत गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात आहे. याच गुन्ह्यात महेंद्र तुरूंगात शिक्षा भोगत होता. तर अनिल हा जामिनावर बाहेर होता. अनिलचे महेंद्रच्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याची माहिती महेंद्रला मिळाली होती.

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या
SHARES

दादर परिसरात ९ मार्च रोजी करण्यात आलेल्या अनिल शेलार याच्या हत्येप्रकरणी मुंबई सेंट्रल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महेंद्र सोलंकी आणि गणेश वाघेला अशी या दोघांची नावे आहेत. महेंद्रच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबधातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


सराईत गुन्हेगार

 अनिल हा धारावी परिसरात त्याची आई आणि लहान मुलासोबत राहतो. काही वर्षांपूर्वीच अनिलचे पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे ती त्याच्यापासून वेगळी राहत होती. अनिल आणि महेंद्र हे दोघे ही एकाच परिसरात रहात असून दोघांवर सराईत गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात आहे. याच गुन्ह्यात महेंद्र तुरूंगात शिक्षा भोगत होता. तर अनिल हा जामिनावर बाहेर होता. अनिलचे महेंद्रच्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याची माहिती महेंद्रला मिळाली होती. त्यामुळे जेलमधून नुकताच शिक्षा भोगून बाहेर पडलेला महेंद्र अनिलचा शोध घेत होता.


लोखंडी राॅडने मारहाण

 महेंद्र अनिलचा शोध घेण्यासाठी अनिलचा भाऊ सुनिलच्या वडाळा येथील ही घरी गेला होता. त्यावेळी महेंद्रने सुनिलला अनिलला समजवण्यासही सांगितले. मात्र तरीही अनिल लपून महेंद्रच्या पत्नीस भेटत असल्याचा संशयावरून महेंद्रने दादर स्थानक परिसरात झोपलेल्या अनिलच्या डोक्यात लोखंडी राॅडने मारहाण केली. त्यात अनिलचा दोन दिवसांनी सायन रुग्णालयात मृत्यू झाला.



हेही वाचा - 

बनावट संस्थेच्या नावाने १९४ कोटी उकळले

पबमध्ये विवाहितेशी गैरकृत्य, गुजरातमधील ४ व्यावसायिकांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा