साकीनाक्यात शौचालयाचं दार ठोठावल्यानं एकाची हत्या

सार्वजनिक शौचालयात जाण्यावरून झालेल्या भांडणात एकाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी वडाळा टीटी येथे घडली होती. अाता साकीनाकामध्ये पुन्हा एकदा अशाच वादातून दुसरी हत्या घडली.

साकीनाक्यात शौचालयाचं दार ठोठावल्यानं एकाची हत्या
SHARES

साकीनाका परिसरात सार्वजनिक सुलभ शौचालयाचं दार ठोकवल्याच्या शुल्लक कारणावरून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. गणेश किर्लोसकर असं या मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी प्रवीण गावडे या तरुणाला अटक केली आहे.


भांडण सोडवणं जीवावर

सार्वजनिक शौचालयात जाण्यावरून झालेल्या भांडणात एकाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी वडाळा टीटी येथे घडली होती. अाता साकीनाकामध्ये पुन्हा एकदा अशाच वादातून दुसरी हत्या घडली. साकीनाकाच्या तानाजी नगर-सफेद पूल परिसरात राहणारा प्रविण गावडे हा शनिवारी दुपारी शौचालयामध्ये शौचास गेला होता. त्यावेळी एका मुलगा बाहेरून  दरवाजा ठोठावत होता. बाथरूमचा दरवाजा उघडल्यानंतर प्रवीणने त्या मुलाला धक्काबुक्की केली. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद शीगेला पोहचला. दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. ही भांडणे सोडवण्यासाठी त्या मुलाचा चुलता गणेश किर्लोसकर गेला असता प्रवीणने त्याला गंभीर मारहाण केली.


जागीच बेशुद्ध 

या मारहाणीत गणेश जागीच बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी जवळील शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवीणला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. तर गणेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.



हेही वाचा -

सराईत ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उच्चभ्रू वस्तीत काम मिळवत चोऱ्या करणाऱ्या मोलकरणीला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा