कुरारमध्ये मित्रानं केली मित्राची हत्या


कुरारमध्ये मित्रानं केली मित्राची हत्या
SHARES

कुरारगाव - पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना कुरारमध्ये घडलीय. यामध्ये साजिद उर्फ सज्जु सय्यद (25) याचा मृत्यू झाला. तर कादिर शेख हा जखमी झालाय. याप्रकरणी आरोपी नितेश अनिल मिश्रा (22) याला कुरार पोलिसांनी अटक केलीय. नितेश मिश्रा आणि साजिद आणि कादिर शेख हे तिघे एका पॅकर्स कंपनीत एकत्र कामाला होते. कादिर रमजान शेख आणि तरुण साजिद यांचे आरोपीकडून काही पैसे येणे होते. पैशे मागण्यासाठी दोघे निलेशच्या क्रांतीनगर शिक्षक चाळ इथल्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच आरोपीनं साजीदच्या पाठीवर आणि कादिर याच्या पायावर चाकूनं वार केला. या दोघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत साजिदचा मृत्यू झाला, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक लिंबण्णा व्हनमानं यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा