पाण्याच्या वादातून इसमाची हत्या

दहिसर - पिण्याच्या पाण्याच्या वादातून दहिसरच्या गणपत पाटील नगर रोड नंबर 10 इथे राहणाऱ्या अफजल खान यांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तसेच यातील पुरुष आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Loading Comments