मोजोसचे मालक हाजीर हो…


मोजोसचे मालक हाजीर हो…
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील वन-अबोव्ह पबला लागलेल्या आगीप्रकरणी मोजोस बिस्ट्रोचे मालक आणि संशयीत अारोपी ड्युक तुली तसेच युग पाठक यांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. त्यानुसार हे दोघे गुरूवारी रात्री पोलिस ठाण्यात आपलं म्हणणं मांडण्यासाठी हजर राहणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.


गुन्ह्याची नोंद

कमला मिल कंपाऊंडध्ये वन-अबोव्ह पबला लागलेल्या आगीनंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानंतर मुंबई महापालिकेने कमला मिलमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात केली. त्यावेळी महापालिके्च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनधिकृत बांधकाम तोडत दोषींवर गुन्हे नोंदवले जात होते. त्यामध्ये मोजोसच्या मालकांवर देखील एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सुमोटो नोटीसनंतर जाग

या घटनेनंतर पोलिसांनी मोजोसचे मालक ड्युक तुली आणि युग पाठक यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र पबला लागलेल्या दुर्घटनेनंतर दोघेही पोलिसांसमोर येत नव्हते. त्यावेळी पोलिसांनी दोघांच्या नावाने सुमोटो नोटीस जारी केल्यानंतर या दोघांनी गुरूवारी चौकशीसाठी येत असल्याचं कळवलं. त्याच बरोबर पी २ चे मालक शैलेद्र सिंग यांच्याकडे चौकशीसाठी पोलिसांनी संपर्क केला असता. त्यांनी आपण मुंबईबाहेर असून आल्यानंतर ताबडतोब हजर राहू, असं कळवल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

कमला मिल आग: 'वन अबोव्ह'च्या २ मॅनेजरला अटक

कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा