NCB कडून 3 ड्रग्स तस्कर अटकेत


NCB कडून 3 ड्रग्स तस्कर अटकेत
SHARES

मुंबईमध्ये एनसीबीचं धाडसत्र सुरू झाल्यानंतर अनेक लहान-मोठी नावं ड्रग्स केस मध्ये समोर आली. यामध्ये काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील डोंगरीतील ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकल्यानंतर काल रात्री माहिम परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात MD (Mephedrone)चा साठा आढळला आहे. कमर्शिअल क्वान्टीटी मध्ये हे ड्रग्स आढळल्याने एनसीबीने ते ताब्यात घेत पुढील तपास सुरू ठेवला आहे. या ठिकाणी एनसीबीने ३ जणांना अटक देखील केली आहे.

एनसीबीने २० जानेवारीला चिंकू पठाण ला अटक केली होती. तो कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्यांच्या संपर्कातील एक आहे. या ठिकाणावरून मोठा शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला होता. दरम्यान चिंकू पठाणला अटक झाल्यानंतर त्याची प्रकृती ढासळल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे.  यातील दोन आरोपींकडून पोलिसांनी १३६ ग्रॅम MD जप्त केले आहेत. मोहम्मद बिलाल, शेख गुलाम घोष, शेहबाज शहाआलम शेख अशी या आरोपींची नावे आहेत.  या प्रकरणी NCB चे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा