एमडी ड्रग्जसह एकाला अटक

Mumbai
एमडी ड्रग्जसह एकाला अटक
एमडी ड्रग्जसह एकाला अटक
See all
मुंबई  -  

दानाबंदर- अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला मंगळवारी अंमली पदार्थ विरोध पथकाने नागपाडा परिसरातून अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तीन लाख रुपये किंमतीचे 'एमडी' जप्त केले आहे. डोंगरीतील पठाणवाडी परिसरात राहणारा एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन तस्करी करणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या पथकाने दाणाबंदर येथील एका सार्वजनिक शौचालय परिसरात मंगळवारी सायंकाळी सापळा रचला होता. याच दरम्यान अंमली पदार्थ घेऊन जात असलेल्या इजाज सुपारीवाला (40) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळ 155 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ सापडला. त्याची बाजारभावानुसार किंमत 3 लाख 10 हजार इतकी आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.