डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरण: 'असं' झालं टार्गेट सेट!

सकाळी व्यायामासाठी आलेल्या व्यक्तीने दाभोलकरांना नावाने हाक मारून नमस्कार केल्यानंतर कळसकर याची खात्री पटली. त्यानंतर कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचं तपासात पुढं आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरण: 'असं' झालं टार्गेट सेट!
SHARES

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपीच्या चौकशीतून दररोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. त्यातला नवा खुलासा म्हणजे दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी निघालेला प्रमुख संशयीत शरद कळसकर याने सुरूवातीला दाभोलकर यांना ओळखलंच नव्हतं. परंतु त्याच वेळेस समोरून आलेल्या व्यक्तीने दाभाेलकर यांचा नाव उच्चारताच कळसकरला त्यांची ओळख पटली आणि त्याचं टार्गेट सेट झालं. त्यानंतर कळसकरने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची कबुली एटीएसला दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.


'असा' केला पाठलाग

डाॅ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी शरद कळसकर हा पुण्यात राहून दाभोलकर यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. तर दुसरा संशयीत आरोपी सचिन अंदुरे औरंगाबादहून त्याच दिवशी पुण्यात दाखल झाला होता. संशय येऊ नये म्हणून दोघांनीही स्पोर्ट्स ट्रॅक सूट घातला होता. ठरल्याप्रमाणे दोघांनीही दाभोलकर यांचा पाठलाग करण्याचं ठरवलं. अंदुरे बाईक चालवत होता, तर कळसकर पिस्तुल घेऊन त्याच्या मागे बसला होता. हत्येची जागा पूर्वनियोजीत होती.


कळसकर गोंधळला

त्यानुसार २० आॅगस्ट २०१३ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर दाभोलकर पोहोचले होते. त्यावेळी दोघेही त्यांच्या मागोमाग दुचाकीवर होते. मात्र आपण ज्यांना मारत आहोत ते नेमके दाभोलकरच आहेत का? असा प्रश्न अचानक शरदच्या मनात आल्यामुळे कळसकर गोंधळला.


मग पटली खात्री

त्याच वेळी सकाळी व्यायामासाठी आलेल्या व्यक्तीने दाभोलकरांना नावाने हाक मारून नमस्कार केल्यानंतर कळसकर याची खात्री पटली. त्यानंतर कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचं तपासात पुढं आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी एटीएस आणि सीबीआय संयुक्तरित्या अधिक तपास करत आहेत.हेही वाचा-

दाभोलकर, लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून! सीबीआयचा दावा

शस्त्रसाठ्यासाठी श्रीकांत पांगारकरनेच केली आर्थिक मदत!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा