अारपीएफ जवानांनी वाचवला महिलेचा जीव

कुर्ला - देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कुर्ला स्टेशनवर घडलेल्या एका घटनेतून आलाय. एका महिलेनं चक्क मृत्यूला मात दिलीय. ट्रेनखाली जाणारी ही महिला अक्षरशः मरता-मरता वाचलीये. कुर्ला स्टेशनवरच्या आरपीएफच्या जवानांनी जीवावर खेळून एक जीव वाचवल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.

कुर्ला स्थानकातून एक महिला आपल्या मुलीसोबत गाडी पकडणार होती. मुलगी चढली पण आईला गाडीत चढता आलंच नाही. त्यामुळे मुलीनंही चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचा पाय घसरला आणि ती गाडीखालीच चालली होती... पण ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी तिला खेचून काढलं...

Loading Comments