पहिल्यांदाच कोरोनाच्या भितीने नक्षलवाद्यांनी शरणगती पत्करली


पहिल्यांदाच कोरोनाच्या भितीने नक्षलवाद्यांनी शरणगती पत्करली
SHARES
कोरोना या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव आता शहरातून खेडोपाड्यांपर्यंत पोहचू लागला आहे.  त्याचाच धसका नक्षलवाद्यांनी देखील घेतल्याचे समोर आले आहे. सरकारच्या गोळीला गोळीनेच उत्तर देणाऱ्या नक्षसवाद्यांनी  कोरोनाच्या भितीने बंदुका खाली ठेवल्या आहेत. गडचिरोली, नंदुरबार, धुळे परिसरातील जंगालत राहणा-या आदीवास्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्यावर उपचार व्हावा यासाठी नक्षलवाद्यांनी एका व्हिडिओद्वारे सरकारकडे मागणी केली आहे. उपचारासाठी येणाऱ्यांवर कोणताही हल्ला केला जाणार नाही याची शाश्वती ही व्हिडिओत नक्षलवाद्यांनी दिली आहे. प्रत्यक्षात काही नक्षलवाद्यांना कोरोनासदृश्य लक्षण दिसत असल्यामुळे हा कांगावा सुरू असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणा व्यक्त करत आहेत.देशाच्या इतिहासात प्रथमच अशा पकारे नक्षलवाद्यानी शरणागती पत्करली असल्याची माहिती नक्षलवाद विरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.


 ज्या नक्षलवादी संघटनानी गोळीचे उत्तर गोळीने दिले. तसेच या नक्षलवादी संघटनानी सरकारी यंत्रणा तसेच पोलिस यंत्रणेला सातत्याने टार्गेट केले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. नक्षलवाद्यांची विचारधारा ज्या माओंच्या विचारावर आधारीत आहे. त्या माओंच्या विचारावर चालणार चीन देखील कोरोना समोर हतबल झाला आहे. यामुळे नक्षलवाद्यानी मिळणारी पैसा, शस्त्रे तसेच अन्य स्वरुपातील मदत थंडावली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. देशांत 29 राज्यातील 752 जिल्ह्यांत नक्षलवाद्यांनी हात-पाय पसरले आहेत. तर नक्षलवाद्यांची सध्या 42 गट असुन, या गटांनी ग्रामीण नंतर मोठ्या प्रमाणांत शहरी भागात प्रवेश केला आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात देखील नक्षलवाद्यांचे प्रबल्य आहे. मात्र सध्या याच शहरात मोठ्या प्रमाणांत कोरोनांने धुमाकुळ घातला आहे. तर राज्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यातुन नक्षली देखील सुटले नसल्याची शक्यता आहे.

 पण ते थेट जाहिर करण्यापेक्षा नक्षलवादी संघटना त्यासाठी आता आदिवासींच्या आरोग्याचे कारण पुढे करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.  मात्र त्यातुनही नक्षलवाद्यांचे प्राबल्य ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी राहत असलेल्या आदीवासींची वैद्यकीय चाचणी देखील आवश्यक असल्याचे मत एका अधिका-याने व्यक्त केले. कारण या आदीवासींचा मुक्त संचार असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे नक्षलवाद्यांनी मागितलेली मदत तसेच शस्त्रसंधीचे दिलेले आश्वासन यावर विश्वास ठेऊन नेमकी कोणती पाऊले उचलली जातील, हे लवकरच जाहीर केले जाईल, असे अधिका-याने स्पष्ट केले.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा