ड्रग्ज पेडलरसह टॉलिवूड अभिनेत्रीला घेतले ताब्यात


ड्रग्ज पेडलरसह टॉलिवूड अभिनेत्रीला घेतले ताब्यात
SHARES

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) वाद्रे व मिरारोड परिसरात छापे टाकून एमडी ड्रग्स जप्त केले आहे. वांद्रे येथून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पण मिरा रोड येथील कारवाईतील मुख्य आरोपी मात्र पसार झाला आहे.

हेही वाचाः- PMC Bank scam: प्रवीण राऊतशी संबंधीत ७२ कोटींच्या मालमत्तेवर टाच

मिरारोडमधल्या एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये एनसीबीचा छापा टाकला तर  वांद्रे येतील कारवाीत चांद मोहम्मद शेख (२७) याला ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ससहित केली  आहे. अटक आरोपी चांद मोहम्मद हा मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता मात्र ड्रग्स तस्करीत त्याचा सहभाग आढळला आहे. त्याच्याकडील स्कूटरच्या डिकीमध्ये हे ड्रग्स सापडल्याचे अधिका-याने सांगितले. त्याच्या माहितीवरून मिरा रोड येथील क्राऊन  हॉटेलमध्येही छापा मारण्यात आला. एक टॉलीवूडमधली अभिनेत्री सापडली आहे. ही अभिनेत्री फरार असलेल्या वितरकासोबत थांबली होती.सईद नावाचा हा सप्लायर आहे तो पसार झाला आहे. पण मिरा भाईंदर येथील त्याच्या घरातन काही ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या अभिनेत्रीच्या सहभागाबाबत तपासणी सुरू आहे. पळालेला वितरक सईदच बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनशी नात आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध सुरु आहे.  त्या दृष्टीने तपास सुरू आहे.१ तारखेला ते हॉटेलमध्ये थांबले होते. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत अंदाजे १० लाखापर्यंत आहे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा