COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

PMC Bank scam: प्रवीण राऊतशी संबंधीत ७२ कोटींच्या मालमत्तेवर टाच


PMC Bank scam: प्रवीण राऊतशी संबंधीत ७२ कोटींच्या मालमत्तेवर टाच
SHARES

सक्तवसूली संचलनालयाने(ईडी) पीएमसी बँक गैरव्यवहार आरोपी प्रवीण राऊत याच्याशी संबंधीत ७२ कोटींची मालमत्तेवर टाच आणली आहे. मनी लाँडरींग कायद्यांच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.याच प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.

हेही वाचाः- मनसेचा मोर्चा आता डॉमिनोजकडे

पीएमसी बँकेतील ४३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भादंवि कलम ४०९, ४२० ४६५,४६६,४७१, व १२०(ब) अंतर्गत एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान, वारियम सिंग, जॉय थॉमस व इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील ९५ कोटी एचडीआयएलच्या मार्फत प्रवीण राऊतने इतर ठिकाणी वळते केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहाराचे कोणतेही कागदपत्र करण्यात आलेली नाहीत. या रकमेच्या माध्यमातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती. याशिवाय गैरव्यवहाराती एक कोटी ६० लाख प्रवीणने त्याची पत्नी माधुरी राऊतला दिले होते. त्यातील ५५ लाख रुपये(२३ डिसेंबर,२०१० ला ५० लाख व १५ मार्च २०११ ला पाच लाख रुपये) विनाव्याज कर्ज म्हणून शिवसेने नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. त्या रकमेतून दादर पूर्व येथे घर खरेदी करण्यात आले होते. याशिवाय माधुरी राऊत व वर्षा राऊत या मे. अवनी कन्स्ट्रक्शन कंपनीत भागिदार असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

हेही वाचाः- 'शिवशाही' कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर

यापूर्वी याप्रकरणी राकेश वाधवान व वाधवान कुटुंबियांशी संबंधीत २९३ कोटी रुपयांची मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. तसेच ६३ कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.   याच प्रकरणी वर्षा राऊत यांनाही समन्स पाठवण्यात आला होता. त्या चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांनी काही अवधीची मागणी केली आहे.  त्यामुळे आताही ५ जानेवारीला ही चौकशी होणार आहे.   महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री  आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा