कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीकडून पुनर्तपास; आणखी ८ जण ताब्यात

एनसीबीनं सोमवारी सकाळी मुंबईला परतलेल्या क्रूझची झडती घेतली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणखी ड्रग्स जप्त केले असून, ८ जणांना ताब्यात घेतले आहे.

कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीकडून पुनर्तपास; आणखी ८ जण ताब्यात
SHARES

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) शनिवारी कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात ५ ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

या कारवाईत एनसीबीनं १२ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये ९ मुलांचा आणि ३ मुलींचा समावेश असून, एनसीबीनं पुन्हा एकदा क्रूझवर छापा टाकत चौकशी केली. यामध्ये आणखी ८ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

एनसीबीनं सोमवारी सकाळी मुंबईला परतलेल्या क्रूझची झडती घेतली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणखी ड्रग्स जप्त केले असून, ८ जणांना ताब्यात घेतले आहे. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत ८ जणांना एनसीबीनं अटक केली.

रविवारच्या तपासानंतर एनसीबीचं हेच धाडसत्र सोमवारी पहाटेही सुरु होतं. याच प्रकरणासंदर्भात मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत अमली पदार्थ पुरवणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीनं रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला मुंबई, नवीमुंबई या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.

अमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याने कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अमली पदार्थ पुरवले जातात यासंदर्भातील पुरवठा साखळी आणि इतर महत्वाची माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा