ड्रग्ज प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार आज चौकशी


ड्रग्ज प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार आज चौकशी
SHARES

आपल्या करिअरमध्ये एका मागोमाग एक हिट चित्रपट देणाऱ्या दिपिका पदुकोनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ड कनेक्शनमध्ये दिपिकी, सारा, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रिस सिंह हिचे नाव पुढे आले. त्यानुसार एनसीबीने रकुलची आज चौकशी केली. तर दिपिका पदुकोनला शनिवारी चौकशीसाठी बोलावले. शनिवारी सकाळी १० वा. दिपिका चौकशीला हजर राहणार असल्याचे कळते.   

हेही वाचाः-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला आरेमध्ये मिळणार ८०० एकर जंगल

मुंबई २०१९ मध्ये निर्माता करण जोहरच्या घरी एका चित्रपटाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला दिपिका, रणबीर कपूर, विकी कौशल, मलायइका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर आणि वरून धवन हे उपस्थित होते. या पार्टीचा एक व्हिडिओ करण जोहरने सोशल मिडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत सर्व कलाकार नशेत धूत असल्याचे दिसत होते. या व्हिडिओवर सोशल मिडियावर नागरिकांनी  तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीकडून आता या प्रकरणाचीही चौकशी केली जाणार आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करणाऱ्या निर्माता करण जोहरलाही एनसीबीचे अधिकारी केव्हाही समन्स बजावून चौकशीला बोलवू शकतात. 

हेही वाचाः- पीएमसी बँकेकडून ठेवींवरील व्याजावर १० टक्के टी़डीएस कपात

सध्या सुशांत सिंह  प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीही जेलमध्ये आहे. या तिच्या चौकशीतून अन्य कलाकारांची नावे पुढे आली होती. सुशांतची मॅनेजर जया शाह आणि करिश्मा यांच्या संपर्कात हे सर्व अभिनेत्री होत्या. आता एनसीबी रिया चक्रवर्तीच्या खुलासावर दिपिकाकडे चौकशी करणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान दिपिकाचे २०१७ आणि २०१९ दरम्यानचे ड्रग्ज चॅट सोशल मिडियावर वायरल झाले होते. या संबधिही  एनसीबीचे अधिकारी चौकशी करू शकतात. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा