सूनेचा छळ केल्याप्रकरणी आमदार विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्या चव्हाण व कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले

सूनेचा छळ केल्याप्रकरणी आमदार विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल
SHARES

महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात सूनेने छळ केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल केली आहे. सूनेच्या पोटी दुसऱ्यांदा ही मुलगीच जन्मल्यामुळे चव्हाण कुटुंबिय छळ करत असल्याचे सूनेनं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिस अधिक तपास करित आहेत.


विद्या चव्हाण यांच्या मोठ्या मुलाशी पीडितेचे लग्न काही वर्षापूर्वी झाले होते. दोघांना पहिल्यांदा मुलगी जन्माला आली. त्यानंतर दुसऱ्यांदा चव्हाण कुटुंबियांकडून मुलासाठी दबाव वाढू लागला. दुसरीही मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंब पीडितेचा छळ करत होतं. पीडितेला आधीची मुलगी होती. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मुदतीआधीच प्रसूती होऊन हे बाळ दगावलं. याप्रकारानंतर घरच्यांकडून माझा अधिकच छळ होऊ लागला, असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पीडितेने 16 जानेवारी रोजी विलेपार्ले पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंदवली होती.


त्याआधारे पोलिसांनी पाच ही जणांवर भादंवि कलम 498(अ), 354, 323, 504, 506 आणि 36 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्या चव्हाण व कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा