अभियंत्याला मारहाण प्रकरण, राष्ट्रवादीच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

कथित मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना (ncp party workers arrested) अटक करण्यात आली आहे.

अभियंत्याला मारहाण प्रकरण, राष्ट्रवादीच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
SHARES

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing minister jitendra awhad,) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील एका अभियंत्याने केला होता. या कथित मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना (ncp party workers arrested) अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजपकडून लक्ष्य

भाजपने (bjp) हे प्रकरण लावून धरत जितेंद्र आव्हाड यांचं मंत्रिपद काढून घेत त्यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांकडे केली होती. मारहाण झालेला हा तरूण पेशाने इंजीनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा - माझ्या घराची रेकी, माझी हत्या करण्याचंही ठरलंय, आव्हाडांच्या दाव्याने एकच खळबळ

मारहाणीवर खुलासा

ज्या तरुणाने माझ्या देखत, माझ्या माणसांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार केली आहे. त्या तरूणाला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली ३ वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय, हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी सतत २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार मला सोशल मीडियातून कळाला, असा खुलासा आव्हाड यांनी केला होता. 

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे प्रज्‍वलित करण्‍याचं आवाहन देशवासीयांना उद्देशून केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांच्या भूमिकेवर सोशल मीडियावरून टीका केली होती. त्यानंतर मोदी यांच्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ठाण्यातील कासारवडवली  इथं राहणाऱ्या एका ४० वर्षीय अनंत करमुसे नावाच्या इसमाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (social media) जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का?, असा प्रश्न त्यांनी आव्हाड यांना विचारला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचं एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केलं होतं. 

हेही वाचा - अशा विकृतांना ठेचलंच पाहिजे, मनसेचं जितेंद्र आव्हाडांना समर्थन

बेदम मारहाण

यानंतर करमुसे यांना रविवारी रात्री पोलिसांनी घरातून पोलिस ठाण्यात चल, असं सांगून घरातून बाहेर बोलवलं आणि आव्‍हाड यांच्‍या विवियाना मॉल शेजारील बंगल्‍यावर नेत आव्हाड यांच्या उपस्थितीत २० ते २५ गुंडांनी बेदम मारहाण केली असा आरोप करमुसे यांनी केला आहे. त्यानंतर करमुसे यांच्या तक्रारीवरून वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा