Advertisement

माझ्या घराची रेकी, माझी हत्या करण्याचंही ठरलंय, आव्हाडांच्या दाव्याने एकच खळबळ

काही लोकांनी माझ्या घराची रेकी केली. माझी हत्या करण्याचा कटही आखला जातोय, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing minister jitendra awhad) यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माझ्या घराची रेकी, माझी हत्या करण्याचंही ठरलंय, आव्हाडांच्या दाव्याने एकच खळबळ
SHARES

काही लोकांनी माझ्या घराची रेकी केली. माझी हत्या करण्याचा कटही आखला जातोय, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing minister jitendra awhad) यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह टीका केल्यामुळे आव्हाड यांच्या समर्थकांनी एका तरूणाला मारहाण केल्याच्या आरोपावरून सध्या आव्हाड यांना भाजपकडून (bjp) टार्गेट केलं जात आहे. आव्हाड यांची मंत्रिपदावरून त्वरीत हाकालपट्टी करा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यातच त्यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्रील राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.

हेही वाचा - अशा विकृतांना ठेचलंच पाहिजे, मनसेचं जितेंद्र आव्हाडांना समर्थन

कोण होते त्यात?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा दावा केला आहे. सोबतच आलेल्या धमक्यांचे स्क्रीनशाॅट देखील पोस्ट केले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत की, मागील ५ वर्षांपासून मी हे भोगतोय. माझ्या घराची रेकी करण्यात आली, कुणी केली... माझी हत्या करण्याचं (Threats of murder) देखील ठरलंय, कोण होते त्यात? असा प्रश्न त्यांनी विचारला. आईचे आशीर्वाद पाठिशी असल्यानेच आतापर्यंत सुखरूप आहे. शिवाय पोलीस यावर कारवाई करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 

हे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस, मुंबई पोलीस आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना टॅग केलं आहे. याआधीही तुझा दाभोलकर करू अशा स्वरूपाच्या धमक्या येत असल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता. 

आक्षेपार्ह पोस्ट

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट (bojectionable post)  केल्यानंतर पोलिसांनी घरी येऊन आपल्याला आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं. तिथं आव्हाड यांच्या देखत २० ते २५ गुंडांनी आपल्याला मारहाण केल्याची पोलीस तक्रार ठाण्यातील एका तरूणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजीनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा - निवडणुकीला उभं न राहताच उद्धव ठाकरे होणार आमदार!

मारहाणीवर खुलासा

त्यावरही आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या तरुणाने माझ्या देखत, माझ्या माणसांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार केली आहे. त्या तरूणाला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली ३ वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय, हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी सतत २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार मला सोशल मीडियातून कळाला, असं ते म्हणाले. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय