Advertisement

अशा विकृतांना ठेचलंच पाहिजे, मनसेचं जितेंद्र आव्हाडांना समर्थन

भाजपकडून आव्हाड यांना टार्गेट केलं जात असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिमागे उभी राहिली आहे.

अशा विकृतांना ठेचलंच पाहिजे, मनसेचं जितेंद्र आव्हाडांना समर्थन
SHARES

ठाण्यातील एका तरूणाने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing minister jitendra awad) यांच्यावर बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावरील पोस्ट खटकल्याने आव्हाड यांच्या गुंडांनी ही मारहाण केल्याचं त्याचं म्हणणं आहे. यावरून भाजपकडून आव्हाड यांना टार्गेट केलं जात असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिमागे उभी राहिली आहे. अशा विकृतांना ठेचलंच पाहिजे, या शब्दांत मनसे नेत्या रुपाली ठोंबरे (mns leader rupali thombre) यांनी आव्हाड यांना समर्थन दिलं आहे.

आक्षेपार्ह लिखाण

सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांत पोस्ट केल्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप एका तरूणाने केला आहे. हे प्रकरण वाढल्यावर भाजपनं आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यावर आव्हाड यांनी आपली बाजू मांडताना संबंधित व्यक्तीनं केलेलं आक्षेपार्ह ट्विट सोशल मीडियावर टाकले आहेत. अत्यंत विकृत भाषेतील या पोस्टमध्ये आव्हाड यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह (objectionable post) लिखाण करण्यात आलं आहे.

हेही वाचा- भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, हे आहे कारण

काय म्हणाल्या ठोंबरे? 

त्यावर मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, हा सोशल मीडिया आहे, आपल्या विकृतीचे साधन नाही. सोशल मीडियावरून (social media) चांगलं घ्यायला हवं. तरी विकृती करायला, हात, मन कसं धजावतं. मंत्री असो,सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी याने विकृत पोस्ट, कमेंट करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा.


वेळीच सुधरा

जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे. सोशल मीडियावर ही विकृती संपवली पाहीजे. (विकृत कमेंट करणाऱ्या माणसाला आता केस,आणि मार दोघांचा सामना करावा लागेल. त्यात इज्जत गेली ती वेगळी. कारण बदनामी फक्त महिलेची होती असं नाही तर पुरुषाचीसुद्धा होते तीही घरादारासकट. कशाला हवी अशी विकृती जी सगळ्याच सत्यानाश करेल. अजूनही वेळ गेली नाही, वेळेत सुधारावे विकृत कमेंट करणाऱ्या भावानो.

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे प्रज्‍वलित करण्‍याचं आवाहन देशवासीयांना उद्देशून केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांच्या भूमिकेवर सोशल मीडियावरून टीका केली होती. त्यानंतर मोदी यांच्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ठाण्यातील कासारवडवली  इथं राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का?, असा प्रश्न त्यांनी आव्हाड यांना विचारला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचं एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केलं होतं. 

हेही वाचा- गैरसमज करून घेऊ नका, केंद्राकडून फक्त तांदूळ मिळतोय- मुख्यमंत्री

बेदम मारहाण

यानंतर करमुसे यांना रविवारी रात्री पोलिसांनी घरातून पोलिस ठाण्यात चल, असं सांगून घरातून बाहेर बोलवलं आणि आव्‍हाड यांच्‍या विवियाना मॉल शेजारील बंगल्‍यावर नेत आव्हाड यांच्या उपस्थितीत २० ते २५ गुंडांनी बेदम मारहाण केली असा आरोप करमुसे यांनी केला आहे. त्यानंतर करमुसे यांच्या तक्रारीवरून वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा