भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, हे आहे कारण

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांना मुंबई पोलिसांनी (mumbai police) ताब्यात घेतलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, हे आहे कारण
SHARES

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांना मुंबई पोलिसांनी (mumbai police) ताब्यात घेतलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अटक केल्याची माहिती दिली आहे. सोमय्या यांना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कुणाला चालले होते भेटायला?

जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला सकाळी ११ वाजता भेटण्यासाठी चाललो असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली.

किरीट सोमय्या यांना त्यांचं निवासस्थान असलेल्या मुलुंड येथील निलम नगर मधून ताब्यात घेण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांना ताब्यात घेऊन मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. 

हेही वाचा- Coronavirus Updates: भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे प्रज्‍वलित करण्‍याचं आवाहन देशवासीयांना उद्देशून केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांच्या भूमिकेवर सोशल मीडियावरून टीका केली होती. त्यानंतर मोदी यांच्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ठाण्यातील कासारवडवली  इथं राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का?, असा प्रश्न त्यांनी आव्हाड यांना विचारला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचं एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केलं होतं. 

हेही वाचा- प्रतिबंधित भागात महापालिका पोहोचवणार धान्य

बेदम मारहाण

यानंतर करमुसे यांना रविवारी रात्री पोलिसांनी घरातून पोलिस ठाण्यात चल, असं सांगून घरातून बाहेर बोलवलं आणि आव्‍हाड यांच्‍या विवियाना मॉल शेजारील बंगल्‍यावर नेत आव्हाड यांच्या उपस्थितीत २० ते २५ गुंडांनी बेदम मारहाण केली असा आरोप करमुसे यांनी केला आहे. त्यानंतर करमुसे यांच्या तक्रारीवरून वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


संबंधित विषय