Advertisement

प्रतिबंधित भागात महापालिका पोहोचवणार धान्य

प्रतिबंधित नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेनं धान्याच्या वितरण व्यवस्थेसाठी २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत पथकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

प्रतिबंधित भागात महापालिका पोहोचवणार धान्य
SHARES

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं एखाद्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळल्यास संबंधित परिसर प्रतिबंधित करण्यात येतो. त्यानुसार, राज्यासह मुंबईतील अनेक परिसर महापालिकेकडून प्रतिबंधित करण्यात आले आहेत. अशा भागांतील नागरिकांच्या अन्नपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं या नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेनं धान्याच्या वितरण व्यवस्थेसाठी २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत पथकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. 

धान्याचा साठा करण्यासाठी मध्यवर्ती भागात कोठाराचीही व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून नवे रुग्ण सापडताच संबंधित इमारत वा परिसर प्रतिबंधित करण्यास महापालिकेनं सुरुवात केली आहे. प्रतिबंधित इमारती आणि परिसरांची संख्या २५० च्या वर पोहोचली आहे. प्रतिबंधित भागांमधील नागरिकांना बाहेर जाता येत नाही, तर बाहेरील व्यक्तीला या क्षेत्रात प्रवेश मनाई आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधित भागातील नागरिकांना घरातच बसण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रतिबंधित भागातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू घरी पोहोचविण्याची जबाबदारी महापालिकेनं स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. आतापर्यंत जी-उत्तर विभागातील प्रतिबंधित क्षेत्रात १० हजार, जी-दक्षिणमध्ये ८ हजार धान्याच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याशिवाय, अन्य विभाग कार्यालयांच्या मागणीनुसार ही पाकिटं पुरविण्यात येत आहेत.

धान्याची वाढती मागणी लक्षात घेत त्याच्या वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, तेल, मीठ, मसाला, हळद, चहाची भुकटी, साखर आदी १० ते १२ वस्तूंचा समावेश असलेले सुमारे १५ किलो वजनाचे धान्याचे पाकीट प्रतिबंधित विभागातील रहिवाशांच्या घरी मागणीनुसार पोहोचविण्यात येत आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी सुरक्षा कक्ष



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा