Advertisement

कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी सुरक्षा कक्ष

कस्तुरबा रुग्णालयात आता सुरक्षित चाचणी कक्ष तयार करण्यात आला आहे.

कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी सुरक्षा कक्ष
SHARES

 कस्तुरबा रुग्णालयात आता सुरक्षित चाचणी कक्ष तयार करण्यात आला आहे. चाचणी करणारे डॉक्टर्स, तंत्रज्ञ सुरक्षित राहावेत तसंच चाचण्यांची संख्या वाढावी म्हणून दक्षिण कोरियाच्या धर्तीवर हा कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षामुळे चाचणी करणारे डॉक्टर्स आणि संशयित यांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही.

दक्षिण कोरिया टेलिफोन बूथवर फोनवर बोलण्यासाठी असलेल्या छोटय़ा खोलीसारखा कक्ष उभारून करोना चाचण्या करत असल्याच्या ध्वनिचित्रफिती प्रसारित झाल्या होत्या. अशाच प्रयोग केरळमध्येही करण्यात आला.  त्याच धर्तीवर संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असा कक्ष आता कस्तुरबा रुग्णालयातही तयार करण्यात आला आहे. आठवड्याभरात हा कक्ष कार्यरत होणार आहे.

डीआयवाय हेल्थच्या डॉ. स्वप्निल पारेख यांनी हा कक्ष तयार केला असून तो रुग्णालयाला मोफत उपलब्ध करून दिला आहे. हा कक्ष म्हणजे एक छोटी खोली आहे. त्यात चाचणीसाठी लागणारी सर्व उपकरणे ठेवलेली असतात. त्याचे तापमान नियंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कक्षातील हवा शुद्ध ठेवण्यासाठीही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कक्षाच्या बाहेर रुग्ण बसल्यानंतर त्याच्या घशातील स्रावाचा नमुना घेण्यापुरते डॉक्टरांचे हात बाहेर येतात. मात्र, त्यांनाही रबरी मोजे असतात. त्यामुळे रुग्णाचा आणि डॉक्टरांचा थेट संपर्क होऊ शकत नाही. प्रत्येक चाचणीनंतर बाहेरच्या बाजूने कक्ष र्निजतुक करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.



हेही वाचा -

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा