कुर्ल्यात 16 लाखांच्या 1000-500च्या नोटा जप्त

 Kurla
कुर्ल्यात 16 लाखांच्या 1000-500च्या नोटा जप्त
कुर्ल्यात 16 लाखांच्या 1000-500च्या नोटा जप्त
See all

कुर्ला - नेहरूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी एका कारमधून 16 लाख रुपयांच्या 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. यात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. यात एका माहिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

टेंभी ब्रिज परिसरात गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुरुवार रात्री MH 01 CA 9349 ही कार संशयास्पद आढळली. कार थांबवून चालकाशी विचारपूस केली असता तो घाबरला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात 16 लाख रुपये रकमेच्या जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा सापडल्या. या नोटांविषयी कारचालक समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. चालकासह ही कार नेहरूनगर पोलीस स्टेशनला आणण्यात आली. आयकर विभागला याची माहिती देण्यात आल्याचं नेहरूनगर पोलिसांनी सांगितलं.

Loading Comments