गोवंडीत शेजारीच निघाला वैरी!


गोवंडीत शेजारीच निघाला वैरी!
SHARES

सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या शेजाऱ्याच्या घरात शेजाऱ्यानेच घरफोडी केल्याची घटना गोवंडीत घडली आहे. अाफताब शेख (24) असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडीतल्या म्हाडा कॉलनी परिसरात राहणारा आहे. त्याच्या शेजारी राहणारे सिद्दिकी कुटुंबिय गावाला गेल्याने सोमवारी रात्री आफताबने त्याच परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेतले. त्यानंतर सिद्दिकी यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील रोख रक्कम आणि काही मुद्देमाल असा एकूण 5 लाखांचा ऐवज घेउन या आरोपींनी पळ काढला. 

शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, आफताबच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना मंगळवारी रात्री अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा